🌟परभणीत तथागत भगवान गौतम बुध्दांना हजारोंच्या जनसमुदायाने दिली मानवंदना.....!


🌟तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त भारतीय बौध्द महासभेद्वारे शांतता रॅली🌟


परभणी (दि.२३ मे २०२४) : तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या २५६८ व्या जयंती निमित्त भारतीय बौध्द महासभेच्या वतीने गुरुवार दि.२३ मे २०२४ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात हजारो नागरीकांनी भगवान गौतम बुध्द यांना मानवंदना दिली. यावेळी सामूहिक बुध्द वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

            बौध्द पोर्णिमेनिमित्त भारतीय बौध्द महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या १० दिवशीय श्रामनेर शिबीरातील श्रामनेरांची गुरुवार दि.२३ मे २०२४ रोजी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीस शनिवार बाजार येथून प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, नारायण चाळ मार्गे ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आली. येथेच रॅलीचा समारोप झाला. या ठिकाणी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने सामुहीक बुध्द वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे, जिल्हासरचिटणीस डी. आय. खेडकर, एम. एम. भरणे यांच्या हस्ते दिप - धुप, पुष्प पुजन करण्यात आले. तसेच जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंद भेरजे यांच्या नेतृत्वाखाली  डि. के. टोंम्पे, एन. जी. गोधम, बाबासाहेब धबाले, नागसेन हत्तीअंबीरे, शिवाजीराव वाव्हळे, रवी पुंडगे, राहुल कोसे, डि. एम. वाघमारे, भगवान डाके, अरुण गजभारे व समता सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पुज्य भिक्कु संघाच्या वतीने त्रिसरण पंचशील घेण्यात आले. केंद्रिय शिक्षक डि.आय.खेडकर व बाबासाहेब धबाले यांनी धम्मध्वज वंदना घेतली.

            यावेळी भारतीय बौध्द महासभेचे एस.एस.साळवे, दशरथ गायकवाड, यु.के.सुतार, के.जी.लझडे,एस.एम.कांबळे,नामदेव ढेपे, पी. एल. वानखेडे, एम.एम.बरे, सुनिल कोकरे, ज्ञानोबा खरात यांच्यासह बौध्दाचार्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील  मान्यवर, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या