🌟परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील वाघाळा पशुवैद्यकीय केंद्रा आंतर्गत मान्सुन पुर्ण लसिकरण संपन्न.....!


🌟या लसिकरणाचा शुभारंभ गावचे सरपंच बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले🌟 

प्रतिनिधी

परभणी/पाथरी :- परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील पशुवैद्यकिय केंद्र श्रेणी २ अंतर्गत जनावरांना विविध आजारा साठी प्रतिबंध म्हणून मान्सून पुर्व लसिकरण मोहिमे अंतर्गत लसिकरण कार्यक्रम राबवण्यात आला.

या लसिकरणाचा शुभारंभ गावचे सरपंच बंटी पाटील यांच्या हस्ते बुधवार २२ मे रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आला. या वेळी पशुधन पर्यवेक्षक डॉ जाधव, गावचे माजी उपसरपंच राजेंद्र घुंबरे,नागोराव घुंबरे,सुरेश बोबडे,गोविंद आबा,रणजित घुंबरे,रघुनाथ अंबुरे,योगेश सोळंके, पत्रकार किरण घुंबरे आदी शेतकरी,या केंद्रातील कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती.

या वेळी हजारोच्या संखेतील  गाय, बैल ,वासरे यांना लंपी स्किन डिसीज व म्हैस वर्ग  घटसर्प + फर्या, व शेळ्या,मेंढया ,अंत्रविषार प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या