🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बुधवार दि.२९ मे रोजी पेण मध्ये.....!


🌟देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टोरंटचे करणार उदघाट्न🌟 

पेण - ( प्रतिनिधी ) - मुंबई - गोवा महामार्गवरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी "देवदूत" ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या कार्यअहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टोरंटच्या उद्घाटना निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बुधवार दि.२९ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पेण येथे येत आहेत. त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पेण विधानसभा मतदार संघांचे आमदार रवीशेठ पाटील, अलिबाग विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    कल्पेश ठाकूर हे मागील २० वर्षां पासून मुंबई - गोवा महामार्गावर अपघातग्रस्त नागरिकांना विनामूल्य रुग्ण सेवा उपलब्ध करुन देत आहेत. याच बरोबर महाड - पोलादपूर येथील नैसर्गिक आपत्ती असो अथवा कोरोना काळात गरीब गरजूना अन्न धान्य वाटप, मुंबई - ठाणे परिसरातील कोकणात पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना अन्न दान असे अनेक समजोपयोगी कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यावर प्रभावीत होत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे हस्ते कल्पेश ठाकूर यांच्या वीस वर्षातील कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यासाठी तसेच त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर नव्याने साकारलेल्या साई सहारा रेस्टोरंटचे उद्घाटन करण्यासाठी बुधवारी ( दि.२९) ला सायंकाळी पाच वाजता येणार आहेत.....

   अजितदादा पवार यांच्या या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच महायुती मधील भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यां मध्ये उत्साह संचारला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या