🌟जंग-ए-अजित न्युज - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!

🌟सलमान खान गोळीबारातील आरोपीची आत्महत्या हा मोठा कट ; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप🌟

 ✍️ मोहन चौकेकर

☀️ एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट ; होय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले ते सत्यच बोलले,देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया 

☀️ सांगलीचा उमेदवार टीव्हीवरुनच कळाला; उमेदवारी बाबत चर्चा झालीच नाही, शरद पवारांचा दावा ; शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते, नारायण राणेंची जहरी टीका 

☀️ संभाजीराजेंची जाहीर माफी मागतो, पण आम्ही शेण खाल्लं असेल, म्हणून तुम्ही खाताय का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल ; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर संजय शिरसाटांचाही मोठा गौप्यस्फोट 

☀️ उदयनराजे राज्यसभेवर, शशिकांत शिंदे लोकसभेवर, सातारकरांना दोन खासदार निवडून देण्याची मोठी संधी, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन ; शरद पवारांचा नाईलाज आहे, राज्यातील दोन-तीन जिल्ह्यात अस्तित्व राहिलंय, खासदार उदयनराजे भोसलेंची टीका 

☀️ नरेश म्हस्केंना उमेदवारी देऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं साटंलोटं, भाजप पदाधिकाऱ्याचा दावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नरेश मस्केंची डोकेदुखी थांबेना, भाजपचा विरोध सुरूच, नवी मुंबईनंतर मिरा भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा 

☀️ हेमंत गोडसे, डॉ. भारती पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, नाशिकमध्ये महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन ; भाजप महाराष्ट्रद्रोही, सेक्स स्कँडल करणाऱ्या प्रज्ज्वल रेवण्णावर त्यांनी आधी बोलावं; आदित्य ठाकरे यांचं आव्हान 

☀️ शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सँडविच व्हायचं नसेल तर काँग्रेस विधानसभेला आमची ऑफर नक्कीच स्वीकारेल; प्रकाश आंबेडकरांची पुन्हा साद ; 'मला निवडून आणण्यात मोहिते पाटलांचा मोठा वाटा, पण आता तुम्हीच काढा तुतारीचा काटा' रामदास आठवलेंच्या कवितेनं माढ्यात चढला जोर

☀️ सलमान खान गोळीबारातील आरोपीची आत्महत्या हा मोठा कट; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप 

☀️ महाराष्ट्रात उष्णतेची लाट मुंबईसह कोकणात उन्हाच्या झळा; विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस 

☀️ सुन तुमच्या घरी राहिली तरी तिला बाहेरची समजाल का अजितदादा पवार यांचा सवाल 

☀️ ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पाॅर्न संस्कृती रूजवायची आहे का चित्रा वाघ यांचा सवाल

☀️ तिकडे मलिदा गॅग , इकडे जनता अशी हि लोकसभा निवडणूक आहे रोहित पवारांची अजितदादा पवारांवर टीका

☀️ निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पगडीत गुदमरलेला ---  संजय राऊत                                             

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या