🌟नांदेड-हडपसर उन्हाळी विशेष रेल्वे पुणे मार्गे पनवेल पर्यंत धावणार....!


🌟या बाबत प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने दमरेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवासी वर्गाच्या समस्या त्यांचा समोर मांडल्या🌟

नांदेड विभागाने उन्हाळी स्पेशल म्हणून सुरू केलेली नांदेड-हडपसर गाडी  पुण्यापर्यंत चालवावी ही  मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाची मागणी दक्षिण मध्य रेल्वेने मान्य केली असून आता ही गाडी दि.२९ मे २०२४ पासून पुणे मार्गे पनवेल पर्यंत  धावणार आहे या बाबत माहिती अशी की उन्हाळी स्पेशल गाडी म्हणून नांदेड विभागाने  हडपसर पर्यंत गाडीची घोषणा केली होती परंतु मराठवाड्यातील रेल्वे प्रवासासाठी हडपसर हे ठिकाण खूपच गैरसोयीचे होते आणि वेळापत्रकही खूप लूज टाईम असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती याबाबत ही गाडी सुरू झाल्यापासूनच मराठवाडा रेल्वे  प्रवासी महासंघाने या गाडीच्या वेळापत्रकात बदल करणे तसेच सदर रेल्वेला  पुणे मार्गे पनवेल पर्यंत चालवावी अशी मागणीचा रेटा लावून धरला होता.या बाबत आज प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने दमरे च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवासी वर्गाच्या समस्या त्यांचा समोर मांडल्या.

आता या मागणीला मंजुरी करताना नांदेड-हडपसर उन्हाळी विशेष रेल्वे पुढील फेरी म्हण्जे दि. 29 मे पासून नांदेड- पुणे-पनवेल पर्यंत  धावणार असल्याची माहिती जेष्ठ वाहतूक प्रबंधक श्रीनाथ यांनी मान्य केले.  सदर रेल्वे नांदेड येथून रात्री ९ ला निघून पुणे ला दुसर्‍या दिवशी सकाळी ९ तर पनवेल येथे दुपारी १२चा दरम्यान तर परतीत पनवेल-नांदेड विशेष रेल्वे नांदेड येथून पनवेल येथून दुपारी तीन ला निघून पुणेला सायंकाळी ६ तर आखेरला नांदेड येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 7 दरम्यान पोहचणार असल्याबद्दल त्यांनी मान्य केले

 तसेच यावेळी जनशताब्दी एक्सप्रेस साठी परभणी स्थानकावरून सकाळी सहा पर्यंत करंट बुकिंग ची व्यवस्था करावी ही मागणी देखील मान्य केली. यावेळी रेल्वे अधिकारी अतिरिक्त वाणिज्य प्रबंधक श्रीनिवास सूर्यवंशी, अतिरिक्त वाहतूक अधिकारी विवेकानंद हे देखील उपस्थित होते. नांदेड-औरंगाबाद दैनंदिन रेल्वे ला पूर्ववत सुरू करावेत, नांदेड-रायचूर रेल्वेला संभाजीनगर येथून तर जालना-मुंबई रेल्वेला नांदेड येथून सोडण्याचे मागणी या वेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ.  किरण चिद्रवार, माणिक शिंदे बलसेकर, नारायण अकमार, नंदकुमार दुधेवार आदीचा समावेश होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या