🌟जंगलामध्ये हाडाचा सापळा आढळल्यामुळे खळबळ : दोन महिन्या पूर्वी हरवलेल्या मुलाचा सापळा असल्याची चर्चा....!


🌟मालेगाव तालुक्यातील ग्राम किन्ही राजा येथील घटना : घातपात झाल्याच्या चर्चेला उधाण🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- मालेगाव तालुक्यातील ग्राम किन्ही राजा मधील वार्ड क्र 3 मधील जोगलदरी येथील रहिवाशी असलेल्यांचा मुलगा वय 15 वर्ष, हा दि. 01/04/24 चे 11/00 वा घरुन नेहमीप्रमाणे घरचे  दोन बैल चारण्यासाठी जोगलदरी शेतशिवारात घेऊन गेला. मात्र संध्याकाळी बैल जोडी घरी आली त्यासोबत सदर मुलगा मात्र घरी परत  आला नव्हता. त्यामुळे काही वेळ वाट पाहून त्याच्या शोध घेणे चालू केले. सर्व नातेवाइक मित्र याकडे  विचार पुस करूनही  त्याचा आता पर्यंत शोध लागला नव्हता.त्या मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून मुलाचे वर्णन - गोरा रंग, उंची ४ फुट, अंगात कथीया  रंगाचे बारीक चौकडीचे शर्ट, नाईट पॅन्ट रंग जांभळाचा, व  उजव्या  हातावर नाव मराठीत गोंदलेले असून सोबत मोबाईल असून तो बंद दाखवत आहे.अशा वर्णनाचा मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फुस लावून माझा मुलाला पळवून नेण्याचा फिर्याद ज ऊळ का पोलीस स्टेशन दिली होती असे कळले. 

 मात्र  जवळपास दोन महिने  उलटूनही पूर्ण जोगलदरी सह मित्र व नातेवाईक रात्रीचा दिवस करून शोध घेत आहे मात्र आता पर्यंत त्या मुलाचा कुठेही शोध लागला नाही. तसेच शोध कार्यामध्ये पोलिसांचे पाहीजे तसे सहकार्य मिळत नसल्याचे नातेवाईक यांच्याकडून बोलल्या जात होते.मात्र दि. 27 रोजी किन्ही राजा लगत असलेल्या जंगलात वनमजूर जंगलात पाहणी करीत असताना त्यांना मानवी खोपडी व त्या खाली कथिया रंगाचा चौकडी शर्ट, निळ्या रंगाचा पँट, काळी चप्पल दिसून आल्यामुळे त्यांनी सदरील माहिती पोलीस पाटील, ज ऊ ळका पोलीस यांना देण्यात आली. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्यामुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली, उपस्थित मधून मिळालेल्या माहिती नुसार कपड्याच्या आधारे सदर सापळा हा दोन महिन्यापुर्वी बेपत्ता मुलाचा असल्याचे बोलल्या जात असून दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा गावाजवळ असलेल्या जंगलातच आढळल्यामुळे त्याचा कोणीतरी  घातपात केल्याची चर्चा सर्वत्र चर्चिल्या जात असून वृत लीहेपर्यंत जऊलका पोलीस घटना स्थळी पुढील तपास करीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या