🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार जिवंत हत्येचा दावा खोटा ; अमेरिकन पोलिसांनी आणलं सत्य समोर🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर ; शरद पवार मुलाखत देताना अनेकदा खुर्चीच्या दोन्ही बाजूंवर हलक्याने हात आपटतात, राज ठाकरेंनी सांगितला पवारांच्या बॉडी लँग्वेजचा अर्थ 

* लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 ते 12 तर आम्हाला 8 ते 9 जागांवर विजय मिळेल, शरद पवारांचा जळगावच्या सभेत दावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी नको त्या गोष्टी करतात, मूळ गोष्टी त्यांना समजत नाहीत, शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका 

* पहाटे 5 वाजता जाग येतेच, पण पूर्वी कॉलेजमध्ये असताना उशिरा उठायचो,मला झोप पूर्ण झालेली पाहिजे हे निश्चित,राज ठाकरेंनी सांगितला झोपेचा किस्सा  ;  लेकासाठी बापाची धावाधाव, ठाकरे गटाला धक्का; कल्याणमध्ये प्रकाश म्हात्रेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश 

* नितीन पाटलांना खासदार केलं नाही,  तर पवारांची औलाद नाही, साताऱ्यातील सभेत अजितदादांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला शब्द ;  अजितदादांचा पुतण्याला झटका, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांची साथ सोडली 

* निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल ; बीडमध्येच जातीपातीचं राजकारण कशामुळे? धनंजय मुंडेंचा उद्विग्न सवाल, पंकजांनीही व्यक्त केली खंत 

* रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेरलं, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते-आंदोलक आमने सामने, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी ; नाशिकमध्ये भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट, ओबीसी समाज आक्रमक, मतपेटीतून ताकद दाखवून देण्याचे आवाहन 

* तपास यंत्रणांचा दबाव असता तर संजय राऊत भाजपात आले असते, विनोद तावडेंचे आरोपांना प्रत्युत्तर ;संजय राऊतांची वृत्ती लांडग्याची, ठाकरेंवरही पहिल्यांदाच थेट प्रहार; स्वप्ना पाटकर प्रकरणावरुन नीलम गोऱ्हे संतापल्या 

* सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार जिवंत हत्येचा दावा खोटा ; अमेरिकन पोलिसांनी समोर आणलं सत्य ; सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींचा मोठा खुलासा!लॉरेन्स बिष्णोई गँगकडून गरीब मुलांची दिशाभूल, हल्ला करण्यासाठी आरोपी अनुजवर दबाव 

* मुंबईत येत्या 36 तासांत समुद्र खवळणार, जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता 

* गुजरातसाठी हिरो, मुंबईसाठी झिरो, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये फेल, यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर ; मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं फलंदाजांवर कारवाई करावी, आठव्या पराभवानंतर सेहवाग भडकला                                                   

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या