🌟नांदेड विभागीय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने हज यात्रेकरूंसाठी जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात....!


🌟मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेची मागणी : विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले निवेदन🌟


परभणी (दि.२० मे २०२४) :  नांदेड ते मुंबई सीएसटी मार्गावर हज यात्रेकरूंसाठी एक अतिरिक्त कोच आणि अतिरिक्त गाड्या सोडाव्यात अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

         भारतासह जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.  मक्का आणि मदिना येथे जाण्यासाठी अनेक यात्रेकरू लांबचा प्रवास करतात. महाराष्ट्रातील मराठवाड्यातूनही लाखो यात्रेकरू हज यात्रेसाठी जातात, मात्र सध्या उन्हाळी हंगाम व लग्नसराई सुरू असल्याने सर्व गाड्या फुल्ल असून, आरक्षणाची निश्‍चित तिकिटे उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे हाज यात्रेसाठी जाणार्‍यांना कुटुंबीयांना विविध व्यवस्था करावी लागते. त्यांना प्रवास करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंसाठी सर्व रेल्वेगाड्या मध्ये नांदेड, मुंबई सीएसटी अतिरिक्त जादा डब्यांची व्यवस्था प्रस्थान प्रवासासाठी दि. 26 मे ते 10 जून 2024, परतीच्या प्रवाससाठी दि. 1 ते 20 जुलै पर्यंत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी रफीक पेडगावकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या