🌟पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याचा उष्माघाताने घेतला बळी....!


🌟अल्पभूधारक भाजीपाला उत्पादक/विक्रेता शेतकरी ठरला उष्माघाताचा पहिला बळी🌟

पुर्णा (दि.११ मे २०२४) - पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील अल्पभूधारक भाजीपाला उत्पादक ५४ वर्षीय शेतकरी भानुदास मुंजाजी चापके यांचा अती उष्माघाताने आज शनिवार दि.११ मे२०२४ रोजी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून पुर्णा तालुक्यात उष्माघाताचा ते पहिले बळी ठरले.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की कात्नेश्वर येथील अल्पभूधारक भाजीपाला उत्पादक शेतकरी मयत भानुदास मुंजाजी चापके यांची संदलापूर शिवारातील गट क्रमांक १५ मध्ये दिड/दोन एकर शेती असून यातील काही क्षेत्रात ते भाजीपाला उत्पादन करुन तो बाजारात विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते कात्नेश्वर येथे आठवड्यात प्रत्येक शनिवारी बाजार भरत असल्याने ते आपल्या शेतातील भाजीपाला नेहमी प्रमाणे आज शनिवारी देखील विक्रीसाठी घेऊन आले असता दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने ते बाजारातून आपल्या घरी गेले तब्येत जास्तच बिघडल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे संपूर्ण कात्नेश्वर गाव परिसरात शोककळा पसरली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या