🌟नांदेड शहरातील कृत्रिम पाणीटंचाई विरोधातील लोक चळवळीच्या स्वाक्षरी अभियानाला प्रचंड प्रतिसाद....!


🌟शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर हे अभियान राबविण्यात आले🌟

नांदेड (दि.१० मे २०२४) - नांदेड शहर महानगरपालिकेने मागील दहा दिवसात नांदेडकरांवर कृत्रिम पाणी टंचाई लादली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोक चळवळ या सामाजिक संघटनेच्या वतीने गुरूवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली याला चांगला प्रतिसाद मिळाला.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर हे अभियान राबविण्यात आले. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यासोबतच तेथील विद्यूत पंपही बिघडले. त्यामूळे सलग दहा दिवसांपासून शहराच्या उत्तर भागाला पाणी पुरवठा झाला नाही. या दरम्यान पाण्याविना नागरीकांचे बेहाल झाले. अव्वाच्या सव्वा दर देऊन काही नागरीकांनी पाणी विकत घेतले. नागरीकांना दारोदार जावे लागले. ही पाणी टंचाई लादूनही महापालिकेला त्याचे गांभीर्य नाही. पाणी पुरवठ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरीकांच्या अडचणीत भर पडली.  दरम्यान, पाणी पुरवठा व्यवस्थेवर लाखो रूपये देखभाल खर्च करूनही ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणामुळे उद्भवली आहे. याचा जब विचारण्यासाठी व महापालिकेच्या हलगर्जी पणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी 'लोक चळवळी'कडून स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी शहरातील सर्व क्षेत्रातील नागरीकांनी स्वाक्षरी करून अभियानाला पाठिंबा दिला. 

यावेळी लोकचळवळीचे  दिलीप शिंदे, बालाजी  पवार, गिरीश नारखेडे, गणेश वडगावकर, नरेश दंडवते, श्याम कांबळे, निलेश तादलापूरकर,  राम चव्हाण, चंद्रकांत घाटोळ, प्रल्हाद लोहेकर, बिरबल यादव , गजानन बामणे, भवानिसिंग गहेलोत, विक्की थोरात, सचिन टाक , सिद्धेश्वर मठपती आदिंची उपस्थिती होती.महापालिकेने केलेल्या कृत्रिम पाणी टंचाई संदर्भात 'लोक चळवळी'कडून लवकरच जनहित याचिका दाखल करण्यात येऊन  घडलेल्या घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या