🌟पुर्णेतील रेल्वे डिझेल डेपोतील चोरी प्रकरणानंतर संशयास्पदरित्या मेकॅनिकल स्टोअररुम आगीत भस्मसात....!


🌟रेल्वे मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणी ओएस जे.लक्ष्मणची उचलबांगडी सिसीसी चेपुरी सुरेश यांची चौकशी गुलदस्त्यात ?🌟

🌟मुख्य कर्मीदल अधिक्षक (सिसीसी) चेपुरी सुरेश यांची चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ ?🌟 


नांदेड/पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) - नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळा दि.२९ जानेवारी २०२४ रोजी उघडकीस आल्याच्या घटनेला आज २९ मे रोजी चार महिन्यांचा कालावधी उलटला असून पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या डिझेल घोटाळ्यासह  रेल्वे मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणावर जाणीवपूर्वक मौनव्रत धारण करीत या गंभीर प्रकरणातील पडद्या मागील खऱ्या सुत्रधारांसह रेकॉर्डवरील आरोपींना हेतुपुरस्सर वाचवण्याचा गंभीर प्रकार समोर येत असून डिझेल चोरी प्रकरणात गुंतलेल्या मुख्य आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड,आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर, कांचन कुमार चिफ इन्चार्ज,चौकशीच्या कचाट्यात अडकलेले वरिष्ठ सहाय्यक डिव्हीजनल मेकॅनिकल इंजिनिअर विनोद साठे नांदेड यांना दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक पदोन्नत्या बहाल करून इतरत्र बदल्या केल्याने डिझेल घोटाळ्याची तार वरपर्यंत असल्याचे बोलले जात आहे.


पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील घोटाळेबाज मागील जवळपास दशकभरापासून अत्यंत सुनियोजित पद्धतीने रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल काळाबाजार करीत असतांना सदरील गंभीर बाब रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आली नसावी ? या प्रश्नाचे उत्तर जर खऱ्या अर्थाने शोधायचे असेल तर सदरील रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरण सिबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग करणे काळाची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे दरम्यान २९ जानेवारी २०२४ रोजी रेल्वे डिझेल चोरी प्रकरण परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंगनापूर फाटा येथून रेल्वेला डिझेल पुरवठा करणारे टॅंकर ताब्यात घेऊन उघडकीस आणल्यानंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या खऱ्या परंतु दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागीय प्रशासन मात्र अद्यापही काही घडलेच नाही अश्या आवेशात वावरत या डिझेल महाघोटाळा प्रकरणी सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत असून सदरील पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळा प्रकरणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभेत उपस्थित केले यानंतर रेल्वे मंत्रालयाने दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी चौकशी आदेश जारी करुन तीस दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले परंतु त्या चौकशी आदेशाचे शेवटी झाले तरी काय ? यानंतर दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुर्णा रेल्वे कम्युनिटी हॉल मागील मेकॅनिकल स्टोअररुम भिषण आग लागून या स्टोअररुम मधील कागदपत्रांसह अन्य साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली की घडवली गेली हा योगायोग म्हणावा की सुनियोजित कट ? सदरील मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरण अंगलट येऊ नये याकरिता मुख्य कर्मीदल अधिक्षक (सिसीसी) चेपुरी सुरेश,ओ.एस.जे.लक्ष्मण,जे.व्ही.राव यांनी वरिष्ठांकडे गोलमेल अहवाल सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील बाब गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवघ्या आठ दिवसांपूर्वी ओएस जे.लक्ष्मण यांची उचलबांगडी करुन त्यांची सिएनडब्लू नांदेड येथे बदली केली तर दि.२५ मे २०२४ रोजी सिसीसी चेपुरी सुरेश यांच्या चौकशी संदर्भात आदेश जारी केले परंतु सिसीसी चेपुरी सुरेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पुर्णा डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्यासह मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणाचे गांभीर्य जास्तच वाढतांना दिसत असून सदरील प्रकरणांवर संशयाचे वलय गडद होतांना दिसत आहे.

दरम्यान नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्यासह मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणावर गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून या प्रकरणात गुंतलेल्या आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड,आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर, कांचन कुमार चिफ इन्चार्ज,चौकशीच्या कचाट्यात अडकलेले वरिष्ठ सहाय्यक डिव्हीजनल मेकॅनिकल इंजिनिअर विनोद साठे नांदेड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांना पदोन्नती बहाल करीत असल्यामुळे 'उपरवाला मेहेरबान तो गधा पहलवान' असी अवस्था या प्रकरणात गुंतलेल्या व पाहता पाहता कोट्याधिश झालेल्या घोटाळेबाजांची झाल्याचे पाहावयास मिळत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या