🌟जालना जिल्ह्यातील कोडी आणि रांजणी दरम्यान रेल्वे पटरी दुरुस्तीच्या कामासाठी लाईन ब्लॉक.....!


🌟लाईन ब्लॉकमुळे काही प्रवासी एक्सप्रेस/पॅसेंजर रेल्वे उशिराने धावणार🌟

🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली🌟

नांदेड (दि.१७ मे २०२४) : जालना जिल्ह्यातील कोडी आणि रांजणी दरम्यान रेल्वे पटरीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला असल्यामुळे काही प्रवासी एक्सप्रेस/पॅसेंजर रेल्वे उशिराने धावणार तर एक गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे.

              उद्या शनिवार दि.१८,२१,२५,२८ मे २०२४ व १८,२२,२५,२९ जून २०२४ तसेच दि.०२,०६,०९,१३,१६,२०,२३,२७,३० जुलै रोजी तीन गाड्या  उशिरा धावतील मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस १७६१७ जालना च्या  पुढे १२० मिनिटे उशिरा धावेल तर काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस १७६६१ परभणीच्या पुढे ४० मिनिटे उशिरा धावेल तर १२७८८/१७२३२ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस औरंगाबादच्या पुढे ७० मिनिटे उशिरा धावेल.  

              गाडी क्रमांक १७६८८ धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दि.१९,२२,२६,२९ मे २०२४ व  १९,२३,२६,३० जून २०२४ व दि.२१,२४,२८,३१ जुलै आणि ०४ ऑगस्ट २०२४ ला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या दिनांकास ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या