🌟परभणी जिल्ह्यातील नोंदणीकृत स्थलांतरीत,असंघटीत कामगारांना शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन...!


🌟आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी केले आहे🌟

परभणी (दि.१४ मे २०२४) :  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनवर आधार अधिप्रमाणीत करून धान्य वितरीत करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार सिडींग पूर्ण करून लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरित करण्यात येते.

ईश्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित/असंघटित कामगार, ज्यांना आतापर्यंत रेशनकार्ड वितरीत करण्यात आले नाही अशा लाभार्थ्याना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका वितरीत करण्याची कार्यवाही तहसील स्तरावर करण्यात येणार आहे.

त्यामुळे केंद्र शासनाच्या ईश्रम पोर्टलवरील उर्वरित नोंदणीकृत स्थलांतरीत, रेशनकार्ड नसणा-या कुटुंबप्रमुखांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे रेशनकार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयास अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या