🌟वाशिम जिल्हयातील अनेक गावांमध्ये रिक्त असलेली पोलीस पाटील पदाची पदभरती त्वरीत घेण्याची मागणी....!


🌟जिल्हा उपाध्यक्ष डॉ.माधव हिवाळे यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल🌟 

फुलचंद भगत

वाशिम - वाशिम जिल्हयातील अनेक गावांमध्ये रिक्त असलेली पोलीस पाटील पदाची पदभरती त्वरीत घेण्याबाबत जिल्हा उपाध्यक्ष डॉ.माधव हिवाळे यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेतली असून याबाबत पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय महसुल अधिकार्‍यांना यासंदर्भात पञ दिले आहेत. आता उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलीस पाटील पदभरतीबाबत काय कार्यवाही करतात याकडे जिल्हयातील जनतेचे लक्ष लागले आहे.

               याबाबत अधिक वृत्त असे की, जिल्हयातील अनेक गावांमधील पोलीस पाटलांची पदभरती रखडल्याने गावांचा विकास खुंटला असून ही पदभरती प्रक्रीया तात्काळ सुरु करण्याची मागणी हिवाळे यांच्यावतीने निवेदन देवून करण्यात आली होती. या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हयातील अनेक तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. तसेच अनेक ठिकाणी एकच पोलीस पाटील हा दोन ते तीन गावाचा पदभार सांभाळत आहे. पोलीस पाटील हा गावातील प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यातील दुवा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ‘महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७’ अंमलात आला आणि पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा देण्यात आला. पोलीस पाटलामुळे गावाचा कारभार सुरळीत चालून महसुल विभागालाही हातभार लागतो. मात्र वाशिम जिल्ह्यातील अनेेक गावांमध्ये अद्याप पोलीस पाटील पदे भरण्यात आली नसून अनेक गावांमध्ये ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावामधील कारभार विस्कळीत झाला असून पोलीस पाटलांच्या विविध दाखल्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहेत. अनेक पोलीस पाटलांना दोन ते तीन गावांचा प्रभार दिला गेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी त्यांना शोधावे लागत आहे. ही बाब पाहता जिल्हयातील रिक्त असलेल्या जागांवर त्वरीत पोलीस पाटील पद भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात यावी व ही पदे विनाविलंब भरण्यात यावीत. अन्यथा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला होता.या निवेदनाची जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेवून पोलीस पाटील पदभरतीबाबत उपविभागीय महसुल अधिकार्‍यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. आता उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकार्‍यांच्या या आदेशानुसार काय कार्यवाही करतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या