🌟परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात दि.२७ मे रोजी बुध्दमुर्ती वाटप सोहळा....!


🌟महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष  सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली माहिती🌟


परभणी (दि.२४ मे २०२४) : परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सोमवार दि.२७ मे २०२४ रोजी थायलंड देशातील विविध आकाराच्या २०० तथागत भगवान गौतम बुध्दमुर्तींचे वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमवेळी सुप्रसिध्द गायक अनिरुध्द बनकर यांचा भीमगीत संगीत रजनी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष  सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली.

            या कार्यक्रमास थायलंड देशातील भिक्खू संघ व अतिथी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जगाला शांतता, करुणा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती जगात उत्साहात साजरी करण्यात येत असते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौध्दमय व्हावा असे स्वप्न होते. बुद्ध धम्माचे चक्र गतिमान झाले पाहिजे. गावागावात  शहरात ठिकठिकाणी  बुद्ध विहार निर्माण होत असून बुद्ध डॉ. बाबासाहेबांचे विचार पोहचवण्याचे कार्य झाले पाहिजे या हेतूने या अगोदर थायलंड देशातील बुद्धमूर्तीचे राज्यात व देशात ठिकठिकाणी वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती हत्तीअंबीरे यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या