🌟महिलांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे - पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह पदेशी

🌟परभणीत महिला कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना ते म्हणाले🌟 

परभणी (दि.20 मे 2024) : महिलांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे, तसेच महिलांबाबत असणार्‍या कायद्याचा अभ्यास करुन स्वतःसह इतरांचेही संरक्षण करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले.

             ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) यांच्यावतीने  ग्रामीण जीवनउन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 70 महिलांकरीता 13 दिवशीय उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी शनिवारी (दि.18) भेट दिली. यावेळी महिला संरक्षण कायद्याविषय मार्गदर्शन केले. महिलांनी आधुनिकतेसह आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे, तसेच कर्तृत्ववान बनून स्वतःसह इतरांचेही संरक्षण करणारे बनावे, असे नमूद करीत महिला कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी संचालक जितेंद्र सिंह कुशवाहा यांच्यासह आरसेटीतील सर्व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप मनिषा कदम यांनी केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या