🌟परभणी जिल्ह्यातील सेलू तालुका दबाव गटाची कृषी मंत्र्यांकडे रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी....!


🌟बोगस,अप्रमाणित खतेे,बियाणे व औषधी पुरवठा करणार्‍या कंंपन्यांसह विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाईची मागणी🌟


 
परभणी (दि.०६ मे २०२४) : महाराष्ट्र सरकारने रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती तात्काळ कमी कराव्यात अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाने आज सोमवार दि.०६ मे २०२४ रोजी राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे तालुका महसुल प्रशासनाच्या माध्यमातून पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

               सर्वदूर आधीच अपुरा पाऊस तर कधी अवकाळी पाऊस याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे. त्यात पुन्हा शेतमालाला भाव नाही. चोहोबाजूंनी शेतकरी पिळून काढला जात आहे, अशी खंत दबाव गटाने या निवेदनातून व्यक्त केली. आता पुन्हा रासायनिक खतांच्या किमतीत विनाकारण भरमसाठ वाढ करण्यात आल्याची माहिती माध्यमातून सातत्याने समोर येवू लागली आहे. त्या दिसणारी ही भाववाढ अत्यंत अन्यायकारक आहे. शासनास व खत, औषधी कंपन्यांना शेती व्यवसाय बंद करावयाचा आहे की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे, असेही मत या निवेदनातून व्यक्त करण्यात आली.  खरीप हंगामापूर्वी ही भाववाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, त्याचप्रमाणे पूर्वीच्याच दरात हंगामात पुरेसा व दर्जेदार खते, बियाणे व औषधी पुरवठा करण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात, बोगस, अप्रमाणित खतेे, बियाणे व औषधी पुरवठा करणार्‍या कंंपन्या व विक्री करणारे व्यापारी यांंच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

              या निवेदनावर सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, अ‍ॅड.टि.ए.चव्हाण, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, रामचंद्र कांबळे, आबासाहेब भुजबळ, गुलाब पौळ, रामचंद्र कांबळे, दत्ता कांगणे, सतीश काकडे, लक्ष्मण प्रधान, भारत रवंदळे, लिंबाजी कलाल, जलाल भाई, चिंतामन दौंड, रामचंद्र आघाव, दिलीप मगर, महादेव लोंढे, मुकुंद टेकाळे, उध्दव सोळंके, नारायण पवार, अजित मंडलिक, राजेंद्र केवारे, दिलीप शेवाळे, रऊफ भाई, शेख मतीन दादामियॉ, चंद्रकांत चौधरी, अ‍ॅड. उमेश काष्टे, अ‍ॅड. योगेश सूर्यवंशी, अ‍ॅड. पांडुरंग आवटी, प्ररमेश्‍वर कांदे, प्रमोद वीर, डॉ. गणेश थोरे, अ‍ॅड. देवराव दळवे, उत्तम गवारे, गणेश सोळंके, विलास रोडगे, दत्ता गायके, गणपत मिटकरी आदींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या