🌟डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १०१ जणांनी केले रक्तदान....!


🌟या रक्तदान शिबिराचे आयोजन सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते🌟


परभणी (दि.२६ मे २०२४) परभणी येथील गंगाखेड रस्त्यावरील कृष्णाई ग्रीन पार्कमध्ये  प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १०१ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

      यावेळी डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे बोलताना म्हणाले कि, माणसाच्या जीवनात रक्ताला अनन्य साधारण महत्व आहे.एका माणसाचे रक्त दुसऱ्या माणसाचे जीवन वाचवण्यासाठी उपयोगी पडते. सध्या रक्ताचा तुटवडा असून प्रत्येकानी रक्तदान केले पाहिजे. रक्तामुळे माणसाला जीवदान मिळते असे स्पष्ट प्रतिपादन व्यक्त केले.

या शिबिरास अरविंद भक्ते ,प्रा.डॉ.संजय जाधव, राजेश रणखांबे , यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजकुमार एंगडे, सुधीर कांबळे , मंचक खंदारे,  प्रा.डॉ. सुनिल तुरुकमाने , चंद्रशेखर साळवे , शशिकांत हत्तीअंबिरे, उत्तम गायकवाड,  दिलीप मालसमिंदर, अंबादास तूपसमुंद्रे, अजय रसाळ,  भूषण कसबे,व जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. रुपाली रामटेके, रक्त संक्रमण अधिकारी, आत्माराम जटाळे, विकास कांबळे,संजय वाघमारे, किशोर जाधव ,रक्त वैज्ञानिक अधिकारी मारोती सिरगजवार , रुस्तुम समणे  परिचर यांची यांची उपस्थिती होती. 

यावेळी प्रा.डॉ.संजय जाधव ,अरविंद भक्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनुमान गायकवाड ,आभार प्रदर्शन मकरंद बाणेगावकर यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी रमेश सिद्धेवाड, मकरंद बानेगावकर, विशाल देशमुख,कुणाल भांगे, लक्ष्मीकांत देवकाते,प्रसाद शिंदे,राठोड साहेब , देवकाते सर , गायकवाड साहेब, सुर्वे, प्रतीक शिंदे , चैतन्य गायगोधने,भूषण कदम , प्रताप गायकवाड, बाळू टोकवार राजू अवाड यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या