🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या परभणी-परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या भुसंपादनाची अधिसूचना जारी....!



🌟या कामाच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत🌟

नांदेड (दि.२३ मे २०२४) :- नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या परभणी ते परळी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाकरीता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने भूसंपादना संदर्भात जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

 परभणी ते परळी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे अशी अपेक्षा परभणीकरांमधून व्यक्त होत होती. विशेषतः माजी खासदार अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांनी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाकरीता त्यांच्या कार्यकाळात व त्यानंतरसुध्दा सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. विशेषतः परळी औष्णिक विद्युत केंद्रास दररोज तीन कोळशाच्या वॅगन्स जात असतांना तसेच इतर मालगाड्या व प्रवाशी गाड्यांचीही मोठी वाहतूक असतांना परळी किंवा परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे वाहतूकीची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, या दृष्टीने दुहेरीकरण गरजेचे आहे, हे निदर्शनास आणून दिले होते. कुरुडवाडी, उस्मानाबाद, लातूर, बिदर, उदगीर, परळी तर नगर, बीड, परळी हा रेल्वेमार्गही लवकरच मार्गी लागणार आहे, हे स्पष्ट करतेवेळी परभणी परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाबरोबर परभणी रेल्वेस्थानकास बायपाससुध्दा उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

         दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे विभागाने परभणी ते परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द करीत या कामाच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या