🌟परभणी तालुक्यातील जमिनींचा एका साल लावणी वर्षासाठी जाहीर लिलाव गुरुवारी.....!


🌟या जमिनीच्या लिलावात इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी केले🌟

परभणी (दि.27 मे 2024) : तालुक्यातील पिंपरी देशमुख, धर्मापुरी, पोरजवळा, जलालपूर आणि पिंपळा या गावांमधील जमिनींचे एक लावणी वर्ष 2024-25 साठी जाहीर लिलावाची प्रक्रिया गुरुवारी (दि. 30 मे) रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय परभणी येथे पार पाडली जाणार आहे. या जमिनीच्या लिलावात इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

परभणी तालुक्यातील इनामी जमिनींचे 2024-25 या एका लावणी वर्षांच्या कालावधीसाठी पिंपरी देशमुख येथील इनामी जमीन गट नंबर 183 मधील 12 हेक्टर 14 आर, धर्मापुरी येथील गट नंबर 199 मधील 12 हेक्टर 6 आर, पोरजवळा येथील गट नंबर 68 मधील 5 हेक्टर 52 आर, जलालपूर येथील गट नंबर 68 मधील 2 हेक्टर 30 आर आणि पिंपळा येथील गट नंबर 79 मधील 4 हेक्टर 46 आर क्षेत्रफळाच्या जमिनीचा जाहीर लिलाव गुरुवारी  30 मे रोजी होणार आहे. 

मोलमजुरीची रक्कम लिलाव लावणी रक्कमा शिवाय राहिल. जास्तीत जास्त रक्कमेची बोली लावणारे नावे लावणी लिलाव मंजुर करण्यात येईल. लिलाव मंजुर होताच पुर्ण रक्कम जमा करावी लागेल. लिलाव मंजूर होताच 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून द्यावा लागेल. सरकारी रक्कमेचे 50 टक्के रक्कम आधी भरल्याशिवाय बोली धारकास बोली बोलण्याची परवानगी नाही. लावणी अंतिम करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी, परभणी यांच्याकडे राहतील. कोणतीही बोली कारणास्तव नाकारण्याचे व स्विकारण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी, परभणी यांच्याकडे राहतील. एक साल लावणीमध्ये बोली धारकांनी अंतिम बोली बोलल्यानंतर त्याच वेळी व त्या दिवशी एकसाल लावणीची संपूर्ण रक्कम या कार्यालयास जमा करावी. तदनंतरच एकसाल लावणी जमीन संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत ताब्यात देण्यात येईल......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या