🌟धर्माचे स्तोम माजवून केवळ लोकांत धर्म आणि जातींचे ध्रुवीकरण करून सत्तेचे राजकारण केले जाते - प्रकाश कांबळे


🌟मनुस्मृति आणि तत्सम विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे सुचविणारा व्यक्तिही दोषी🌟


 
 'परखड सत्य' :- लेखक : प्रकाश कांबळे

आम.जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृति च्या निषेधार्थ करीत असलेल्या आंदोलनात अनवधानाने परम पूज्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर मनुस्मृति जाळतानांचा फोटो फाडला.त्यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली. चुकीला माफी नसल्याने महाडच्या पोलिसांनी त्यांचे विरुद्ध कायदेशीर गुन्हाही दाखल केल्याचे वृत्त वाहिन्यांवरून पाहायला मिळाले.आव्हाडांच्या पक्षाचे नेतेही त्याबाबत काय तो निर्णय घेतील.पण भाजपा च्या लोकांना याबाबत फारच दुःख झाल्याचे दिसते. म्हणे भाजपा या विरुद्ध राज्यभर आंदोलन करणार.अशी घोषणा त्यांच्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षांनी केले. चुकीच्या घटनांचे निषेध ही केले पाहिजे,आणि त्यासाठी आंदोलनही केले पाहिजे.पण ज्या विषयासाठी जितेंद्र आव्हाड आंदोलन करीत होते त्या विषयाबद्दल आपली भूमिका काय आहे.हे अगोदर स्पष्ट करा.शिवाय राज्यात आणि देशात विषमता पसरविणारी विषवल्ली " मनुस्मृति " आणि तत्सम विषय शालेय पाठ्य पुस्तकाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावेत.हे सुचविणाऱ्या व्यक्तिलाही दोषी धरून त्याचे विरुद्ध ही कडक कार्यवाही करण्याचे धाडस महाराष्ट्र सरकार करणार आहे का? प्रथम तर ज्या सुपीक डोक्यातून मनुस्मृति शालेय अभ्यास क्रमात यावी असे वाटले,तो दोषी नाही काय? तो आधिकरी, पदाधिकारी, की मंत्री तोही दोषीच ठरतो.मग त्याचे विरुद्ध ही कोणती कार्यवाही होणार आहे? हे महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचे आहे.संविधानाच्या प्रास्ताविकेत नेहमी शब्द छल होतो.त्याच्या पाठीशी कुणाचे कारस्थान असते.?त्याचाही शोध घेवून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करणार का ?

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फारच पुळका आलेल्या लोकांना संसदेच्या हाकेच्या अंतरावर  भारतीय संविधान ग्रंथाची होळी करतांना दिसली नव्हती का? शेकडो माथेफिरू संविधाना विरुद्ध खुलेआम गरळ ओकत फिरतात ,तेंव्हा त्यांचे आवाज त्यांचे काना पर्यंत पोंहोचत नाहीत का?त्यांचे विरुद्ध सरकार म्हणणाऱ्या यंत्रणेने आजपर्यंत कोणते कठोर गुन्हे दाखल केले?या आणि अशा किती तरी घटनांचे उतारे देता येतील.ज्यावर केवळ डोळेझाक केली जाते.

           स्वांतत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशात संविधानाचे धडे देशवासीयांना शिकविले जात नाहीत,शालेय शिक्षणातून ही संविधान शिकविले जात नाही.धर्माचे स्तोम माजवून केवळ लोकांत धर्म आणि जातींचे ध्रुवीकरण करून सत्तेचे राजकारण केले जाते.आरोप प्रत्यारोपासाठी नको ते विषय घेवून लोकांच्या भावना भडकिवल्या जातात .खरोखरच डॉ.बाबसाहेब आंबेडकरां बद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या संविधाना बद्दल एवढ्या  निष्ठा असतील तर "भारतीय संविधान"हा आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे.आणि तो आम्ही बालवाडी पासून उच्च शिक्षणापर्यंत अभ्यासक्रमात समाविष्ट करू. यासाठी कटीबद्ध व्हा.संविधान तंतोतंत पालन करण्याची शपथ  घ्या. मनात मनुस्मृति आणि मुखवटे संविधानाचे घालून फक्त राजकारण होईलही. पण ते जास्त दिवस चालणार नाही.एका आव्हाडांना त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना मिळेलही,पण संविधानाचे मुखवटे घालून मनुस्मृतीचे चोरुन चोरुन काम करणाऱ्यांचे काय? चोरांच्या उलट्या बोंबाच ना.?

 'परखड सत्य' :- लेखक : प्रकाश कांबळे

 जेष्ठ रिपाइं नेते जेष्ठ आंबेडकरी विचारवंत पूर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या