🌟हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी केली गजाआड...!


🌟वसमत शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील ०२ घरफोडीचे गुन्हे उघड : २९ ग्रॅम सोन्याचे व ६० तोळे वजनाचे चांदीचे दागीने जप्त🌟 

हिंगोली : पोलीस स्टेशन वसमत शहर हददीतील जिबोद्दीन सिद्दीकी रा.जवाहर कॉलणी वसमत यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्या चांदीचे दागीने चोरी करून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचे तकारी वरून पोस्टे. बसमत शहर येथे दिनांक २९/०२/२०२४ रोजी गुरनं. ११५/२०२४ कलम ४५४,४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच वसमत शहरातील नामे राजाभाऊ सौदनकर रा. मंगळवारापेठ यांचेभरी कोणीच नसल्याचे संभी साधुन अज्ञात आरोपींनी नगदी रूपये व चांदीचे दागीने चोरी करून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचे तकारी वरून पोस्टे. वसमत शहर येथे दिनांक १०/०५/२०२४ रोजी गुरनं. २५८/२०२४ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हे तात्काळ उघड करून गुन्हयातील आरोपींना पकडुन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत हिंगोली जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन मार्गदर्शन केले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या