🌟शेलुबाजार परिसरात विजेचा लपंडाव;नागरीक ञस्त वारंवार विजखंडीत होत असल्यामुळे महावितरणप्रती रोष....!


🌟नियमीत विज सुरु राहावी यासाठी नागरीकांचा रास्तारोको🌟


फुलचंद भगत

वाशिम : सध्या कडक ऊन्हाळा तापत आहे.तप्त उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत आहे अशातच माञ विजेचा लपंडाव सुरु असुन वारंवार विजखंडित होत असल्याने नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे त्यामुळे महावितरण कंपनीप्रती रोष व्यक्त होत आहे.वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी नागपूर -संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.

                 विज खंडीत होणे ही नित्याचिच बाब आता बनली आहे.गत काही दिवसापासून शेलूबाजारच नव्हे तर अनेक गावातील वीज पुरवठा काही ना काही कारणाने वारंवार खंडित होत असल्यामुळे ऐन उकड्याच्या दिवसात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण विभागाकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची अनेक वेळा मागणी केल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी नागपूर -संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.अर्ध्या तासाहूनही अधिक वेळ चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली तर वाहन चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या