🌟परभणी जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी सुरू होण्यापुर्वीच अन्नदात्या शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या शोषकांची जय्यत तयारी..!


🌟जिल्ह्यातील पेडगावात सापडला बनावट खताचा मोठा साठा🌟

परभणी : परभणी जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होण्यापूर्वीच बनावट खत/बि-बियाणे विक्री करुन अन्नदाता शेतकऱ्यांचे आर्थिक/मानसिक शोषण करणाऱ्या आसूरी शोषकांनी जय्यत तयारी केल्याचे निदर्शनास येत असून परभणी तालुक्यातील पेडगाव परिसरात डिएपी 10-2626 बनावट खताचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ माजली असून जिल्ह्यात बनावट खत/बि-बियाने विक्री करुन अन्नदाता शेतकऱ्यांचे आर्थिक मानसिक शोषण करणाऱ्या आसूरी शोषकांना परभणी जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करुन लगाम लागावा अशी मागणी होत आहे.

दरम्यान कृषि विभागाचे राज्य गुणनियंत्रण प्रविण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणनियंत्रण प्रविण भोर यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांच्या पथकाने पेडगावात एका कृषि केंद्रात डमी ग्राहक पाठवून एक बॅग खरेदी केली. ती बॅग बनावट असल्याचे आढळले. पाठोपाठ त्या व्यापार्‍याच्या गोदामावर छापा मारुन खताचा तो बनावट साठा ताब्यात घेतल्याची माहिती हाती आली आहे. अधिकृत तपशील कळाला नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या