🌟वाशिम जिल्ह्यात दोन ठिकाणी कुजलेले मृतदेह आढळल्याने एकच खळबळ....!


🌟विविध ठिकाणी जंगल परिसरात दोन मृतदेह आढळल्याने खळबळ🌟

फुलचंद भगत

वाशिम:-वाशिमच्या मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यात काटेपूर्णा  जंगलात  दि.२७ मे रोजी विविध दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली   नेमकी दोन्ही घटनानां घातपाताची किनार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

               वाशिमच्या मंगरूळपिर तालुक्यातील जनुना खुर्द येथील ३७ वर्षीय विठ्ठल खुळे या तरुणाचा मृतदेह काटेपूर्णा जंगल परिसरात एका झाडाला लटकून कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय.त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.दोन महिन्यापूर्वी घरगुती वादातून  खुळे हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते असे कळले.या घटनेचा तपास मंगरुळपिर पोलीस करत आहे.तर  मालेगाव तालुक्यातील जोगलदरीच्या जंगलामध्ये  कुजलेल्या अवस्थेतील हाडाचा सापळा असलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.जोगलदरी येथील 15 वर्षीय बालक   शिवदास  गोदमले दि.1 एप्रिल 2024 घरुन नेहमीप्रमाणे आपल्या घरचे   दोन बैल चारण्यासाठी जोगलदरी शेतशिवारात घेऊन गेला. मात्र, संध्याकाळी बैल जोडी घरी परतली मात्र  त्यासोबत शिवदास  घरी परतला नव्हता.कपड्याच्या आधारे  सापळा  बेपत्ता असलेल्या  शिवदास गोदमले 15  वर्षीय बालक  जोगलदरी गावातील असल्याचे बोलल्या जात आहे.दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या शिवदास  जंगलातच आढळल्यामुळे   शिवदासचा अज्ञातांनी घातपात  घडवुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची चर्चेला उधाण आलंय  घटनास्थळी जऊळका पोलीस  पोहचले असून घटनेचा तपास पोलीस करत आहे.एकूणच  एकाच दिवशी दोन मृतदेह आढळून आल्याने पोलिसांच्या  भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले आहेत.जिल्ह्यात  नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या