🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे 'द बर्निंग कार'चा थरार.....!


🌟या घटनेत कार मालक थोडक्यात बचावले : कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे बुधवार दि.०१ मे २०२३ रोजी दुपारी ०३.३० वाजेच्या सुमारास 'द बर्निंग कार'चा थरारक घटना घडली.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की एम.एच.०४ ए.झेड ७०५० व्ही डब्ल्यू वेंटो कार गाडी मालक ज्ञानेश्वर विष्णू कातडे यांच्या मालकीच्या कारणे अचानक पेट घेतला या घटनेत ते थोडक्यात बचावले आगीची माहिती नगर परिषदला दिली त्यामुळे तात्काळ अग्निशामक चे ड्रायव्हर संजू रेवाळे,फायरमन राहुल गुल्हाने, अनुराग बारबोले, नरेंद्र भोयर आगीच्या ठिकाणी पोहचून आग आटोक्यात आणली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या