🌟रामराजे फड खांदगावकर,माधव मुंडे यांना ईगल फाउंडेशन चा 'राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्कार-२०२४' जाहीर....!


🌟ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 जून  रोजी दिला जाणार पुरस्कार🌟 


परळी( प्रतिनिधी) शिक्षण सम्राट अध्यक्ष : स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगाखेड रामराजे फड खादगावकर व दयाधर्म  सामाजिक प्रतिष्ठान  हाळम,  तथा हाळम फेस्टिवलचे अध्यक्ष,  जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस माधव मुंडे यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन ईगल फाउंडेशनचा राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     ईगल फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 जून 2024 रोजी मा.डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे सकाळी 10.30 वाजता विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात रामराजे फड खादगावकर व माधव मुंडे याना राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्कार 2024 देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप  सन्मानपत्र  ट्रॉफी शाल श्रीफळ व असे आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खादगावकर व मुंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या