🌟'मोगलाई धम्माल' या ॲड.अनंतराव उमरीकर लिखित नाटकाचा राज्यात द्वितीय क्रमांक.....!


🌟या स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मुंबई येथे पार पडली🌟

परभणी (दि.०२ मे २०२४) :- महाराष्ट्र राज्यभरात शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्यकलेचा जागर करत अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई कडून घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यस्पर्धेमध्ये किशोर पुराणिक यांनी सादर केलेल्या 'मोगलाई धम्माल' या ॲड.अनंतराव उमरीकर लिखित नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

          या स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मुंबई येथे पार पडली. प्राथमिक फेरी आणि उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातून ३० जणांची निवड करण्यात आली होती. सदरील नाटकांमध्ये किशोर पुराणिक यांनी विविध भूमिकांच्या माध्यमातून, वास्तव घटनेवर आधारित काल्पनिक कथा मांडली होती. विनोदी अंगाने जाणाऱ्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

          अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक (रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल सर्व नाट्य रसिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या