🌟परळी नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग ; मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू.....!


🌟नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- नगर परिषदच्या वतीने शहरातील मोठ्या नदी व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मान्सून तोंडावर आला असताना नगरपालिका क्षेत्रातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाईच्या कामे वेगाने सुरु आहेत. यासाठी जे.से.बी., ट्रॅक्टर आदी मशनरीसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करुन साफसफई करण्यात येत असल्याची माहिती देऊन यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे. 


        शहरातील नाल्यामध्ये कचर्‍यामुळे पाणी साचु नये आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येऊ नये यासाठी परळी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडुन मान्सुन पुर्व स्वच्छता कामांना गती देण्यात आली आहे.  नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्याधिकारी संतोष रोडे व स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे, विशाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील विश्वेश्वर डुबे, विलास केदारी, सुरेश वाल्मिकी, राजाभाऊ जगतकर, राजाभाऊ गायकवाड, जेसीबी चालक सिद्धार्थ कसबे, धनराज कसबे व सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने पावसाळ्यापूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील मोठे नाले आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येणार नाही. नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.  

           परळी शहरातील  सरस्वती नदी गोपाळ टॉकीज ते सार्वजनिक समशान भूमी, उखळवेस ते सिमेंट फेक्ट्ररी, मलिकपुरा, पंचायत समिती ते नाथ रोड, आझाद नगर (वीटभटी पूल) ते रेल्वे लाईन पुल तसेच विविध भागातील नाल्या यासह शहरातील विविध छोट्या मोठ्या नाल्यांमधील गाळ व कचरा काढण्यात येत आहे. यासाठी दोन जेसीबी, पाच ट्रॅक्टरद्वारे व कर्मचार्‍यांच्यासह्याने साफसफई करण्यात येत आहे. पावसाळा सुरु होई पर्यन्त ही साफसफाई करण्यात येणार असुन या काळात शहरातील ज्या नाल्या तुंबल्या आहेत. त्यातील गाळ काढण्यात येणार असुन नागरिकांनी आपला कचरा घंटागाडी मध्ये टाकावा असे आवाहन स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच हे सर्व कामे अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती दिली आहे.  

        शहरात कोणतेही काम करण्यासाठी नागरीकांचा पुढाकार आवश्यक असतो. पावसाळ्यात व्यापारी, नागरीकांना त्रास होऊ नये, शहरातील कोणतीही नाली तुंबू नये यासाठी पालिकेने साफसफईची कामे हाती घेतली आहेत. ही कामे युध्द पातळीवर करण्यात येत आहेत मात्र नागरीकांनीही कचरा नालीत टाकून पाणी वाहून जाण्यास अडथळा होईल असे करू नये, कर्मचारी करीत असलेल्या कामांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या