🌟बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथील अशोक राऊतमारे कुटुंबावर हल्ला करणार्‍यावर कठोर कारवाई करा.....!


🌟परभणी जिल्हा सकल ब्राम्हण समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

परभणी (दि.१५ मे २०२४) : बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथील अशोक राऊतमारे या ब्राह्मण कुटूंबाच्या घरावर दगडफेक करीत झालेल्या हल्ल्याचा येथील सकल ब्राम्हण समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला असून हल्लेखोरांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

            सकल ब्राह्मण समाजाचे परभणी जिल्ह्याचे प्रकाश कौसडीकर, सुरेंद्र नेब, संजय कुलकर्णी, योगेश जोशी, नवनीत पाचपोर, स्वप्निल पिंगळकर, मंदार कुलकर्णी, नंदकुमार पराडकर, संजय वझरकर, पुरूषोत्तम तातोडे, मनोज धर्माधिकारी, सुधाकर गुरू गोळेगावकर, विष्णू वैरागड, गिरीष गावरस्कर, संदिप साळापुरीकर, वैभव असोलेकर, शंकर आजेगावकर, दिपक कुलकर्णी, प्रविण चौधरी, महेंद्र फुटाणे, भरत उपाध्ये, सुरेश जोशी, दिपक कासंडे, श्रीकांत कुलकर्णी, विशाल जोशी, मकरंद मांडे, महेश पारवेकर आदींच्या शिष्टमंडळाने आज बुधवार दि.१५ मे २०२४ रोजी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागणी संदर्भात एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथील अशोक राऊतमारे या ब्राह्मण कुटुंबाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच आमच्या पक्षाला मतदान का केले नाही म्हणून राऊतमारे कुटुंबाच्या विरोधात घोषणा देत घरासमोरील वाहनांची तोडफोड करीत कुटुंबातील सर्वांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील हल्लेखोर गावगुंडाना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा या विरोधात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल ब्राह्मण समाजाने या निवेदनाद्वारे दिला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या