🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण....!


🌟यावेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन झाले🌟

परभणी (दि. 01 एप्रिल) : महाराष्ट दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन झाले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, संगीता चव्हाण, जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कैलास मठपती, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहन महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनिमित्त आज सकाळी प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. वसंत निकम, उपअधीक्षक भूमी अभिलेख द.रा.सोनवणे, वरिष्ठ भूवैज्ञानिक अंजूम कुरणे यांच्यासह शासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या