🌟एकच वेळ पूर्ण वाचा.....80% विद्यार्थी नकल करून पास होणाऱ्या युगात - शमीम खान पठाण


🌟पत्रकार शमीम खान पठाण यांचा मुलगा राशद खान याने इयत्ता 10 वीत 72.20 टक्के मार्क घेऊन मिळवले यश🌟

राशदखान शमीमखान पठाण हा माझा मुलगा जन्म 12 ऑक्टोबर 2010 जन्मताच बुद्धिमान शांत संयमी स्वभाव चेहरा हसरा व आकर्षित करणारा त्यामुळे प्रत्येक जण लाडाने लटकन उचलून घेत असे त्या प्रत्येकाच्या लाडामुळे एक दोन वर्षात त्याच्या स्वभावात खूप बदल व फारसा जिद्द करू लागला त्यामुळे 19 ऑगस्ट 2013 रोजी जिल्हा परिषद ताडकळस येथील उर्दू शाळेत नेऊन बसवले तर तो शाळा सुटेपर्यंत वर्गातच बसून राहिला म्हणून दुसऱ्या दिवसापासून सलग त्याला शाळेत वर्षभर पाठवले आमच्या गल्लीतील इतर मुल असल्यामुळे एक दुसऱ्याच्या नादाने नियमितपणे तो शाळेत गेला

    सततची उपस्थिती असल्यामुळे वर्ग शिक्षकांनी दुसऱ्या वर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश नोंद करून हाजरीपटात नाव आम्हाला न सांगताच घेतले तसेच त्याचा दाखला करायचा हे आमच्या लक्षात सुद्धा राहिले नाही पहिली ते चौथी एकाच खोलीत रोज एकच  शिक्षक आणि रोज तेच विद्यार्थी असे एकूण चार वर्ष कसे गेले ते पालकाच्या शिक्षकाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या लक्षात कधीच आले नाही मग चौथी पास झाल्यानंतर इयत्ता पाचवीचा उर्दू चा वर्ग नसल्यामुळे मराठी माध्यमला प्रवेश घ्यावा लागला तेव्हा तिथेही उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वर्गशिक्षक ते मुख्याध्यापक सर्वच जण टाळाटाळ करीत होते परंतु पटसंख्यांची कमतरता तसेच थोडीफार माझी पत्रकारितेची सोबत कामाला आली त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी प्रवेश दिला परंतु इयत्ता पाचवी मध्ये मराठी माध्यम असल्यामुळे त्याला मराठीचे '' म '' लिहिता किंवा वाचता येत नव्हतं कारण तो उर्दू माध्यमातून आला होता उर्दू माध्यमांमध्ये तो फार हुशार होता तेव्हा मी ऋणी आहे त्या जिल्हा परिषद च्या मुकणर सरांचा सरांचा तसे लाभलेले सर्व गुरुजनांचा त्यांनी माझ्या मुलाला माझ्या विचारापलीकडे घडवलं त्यांच्यामूळेच पाचवीला अ आ इ ई उ ऊ शिकणारा विद्यार्थी सहावी सातवी ला वर्गात दुसरा आला.

सातवी पास झाल्यानंतर त्याची बुद्धिमत्ता पाहून मी इंग्रजी माध्यम मधून शिकवण्याचं गणित आखलं जिल्हा परिषद ला टीसी काढण्यासाठी गेलो असता तेथील शिक्षकांनी आम्ही घडवलेला विद्यार्थी आमच्यापासून का नेता तो आमच्याकडे राहिला तर दहावीला 90% च्या पुढे मार्क घेईल म्हणून जिल्हा परिषद लाच ठेवा अशी विनंती केली परंतु शिक्षकाच्या परंतु माझ्या विक्रांत बुद्धीने शिक्षकांच्या विनंतीला मान न देता टीसीला अर्ज केला व अभिनव विद्यालय पूर्णा येथे प्रवेश घ्यायचं ठरवलं

मी व इतर आठ दहा जणांची एक बैठक घेऊन आपापल्या पाल्यांना अभिनव विद्यालय पूर्णा येथे प्रवेश घेऊ म्हणून पुर्णेला गेलो आणि प्रवेश सर्वांच्या मुलांना कुठलीही अडचण न येता मिळाला मात्र राशदला प्रवेश देण्यास सरळ सरळ मुख्याध्यापिका मॅडमनी नकार दिला कारण पहिली ते चौथीपर्यंत उर्दू चौथी ते सातवी पर्यंत मराठी आणि आता आठवी ते दहावी इंग्रजी माध्यम कसं शक्य मग शिंदे सर भाऊ व मी आम्ही सर्वांनी मुख्याध्यापिका तसेच ऑफिसमध्ये हजर असलेल्या शिक्षकांना हमी दिली व राशीदची चार-पाच प्रश्नांची तोंडी परीक्षा घ्यायला लावली तेव्हा तो तोंडी परीक्षेत आमच्या विश्वासाला तडा न देता पास झाला तेव्हा कुठे त्याला अ ब क ड ई पैकी ई या वर्गात प्रवेश देण्यात आला त्यातल्या त्यात आणखी डोकेदुखीला भर म्हणून मुख्याध्यापिका मॅडमनी माझा निदर्शनास नसलेली बाब म्हणजे टीसीवर वेगळे वय आणि आधार वर वेगळं मॅडमनी मला विचारलं तिची आणि आधार पैकी नेमकं खरी जन्मतारीख कोणती आहे मी सांगितलं मॅडम खरी तर आधार वरचीच आहे मग त्या उद्गारल्या किसी वर जिल्हा परिषद मधून बदलून आणा आणि दहावीला एक वर्ष गॅप द्या मी हो म्हणून ताडकळसला आलो दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद मध्ये जाऊन जन्मतारीख बदलण्याची विनंती केली तेव्हा सरांनी सांगितले ज्या सरांनी तुमची टीसी बनवली ते पंधरा-वीस दिवस रजेवर आहेत सीसी ज्या सरांनी बनवली त्यांच्याच अक्षरात बदल करून सही शिक्का मारता येतो मी म्हणलो सर पंधरा दिवस शक्य नाही प्रवेश संपून जातील तेव्हा त्यांनी सल्ला दिला मग आधार वरच वाढवून घ्या आणि प्रवेश घ्या मग मी सुद्धा प्रवेश संपण्याच्या भीतीने तसेच केले दाखवून आधार अपडेट करून जन्मतारीख बदलली

इंग्रजी माध्यमाचा अभ्यास आठवी नववी दहावी तीन वर्ष केला आणि आज इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एकूण 72.20% मार्क पडले विषय 70 71 टक्क्यांचा नाही हे सर्व लिहायचं कारणच की राशीत वयाने दहावीला 2 वर्षाने लहान आहे दुसरं कारण तीन वेळेस त्याच्या शिक्षणाचा मुळासकट बदल सेमी ला फक्त तीनच वर्षे अभ्यास तरी पण 71 टक्के इतरांचे मुलं दहा वर्षे एकाच माध्यमातून असून कॉपी करूनही चाळीस-पन्नास टक्केच्या वर गेले नाहीत विशेष म्हणजे मी आर्थिक परिस्थितीने दुबळा असल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी कमी पडलो म्हणून मला गर्व आहे मी राशदचा वडील असल्याचा तसेच अभिमान आहे जिल्हा परिषदचे मुकणर सर खाजगी वर्गाचे वैजनाथ खुळखुळे सर अभिनव विद्यालयाचे भाकरे सर आशा जिल्हा परिषद ते अभिनव विद्यालयापर्यंत लाभलेल्या गुरुजनांचा शिष्य असल्याचा.......

* धार्मिक अल्पसंख्याक कुटुंबात जन्मलेल्या राशद खान याचे १० वी बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद 

पुर्णा तालुक्यातील ताडकळस सारख्या ग्रामीण भागात जनहितवादी पत्रकारीता करीत असतांना एका निस्वार्थ पत्रकाराचे आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे कळत नकळत दुर्लक्ष होतच असते परंतु कौटुंबिक संस्कार कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशिर्वाद यावर त्या पत्रकाराचा कौटुंबिक गाडा पुढे पुढे जात असतो असेच आमचे एक पत्रकार मित्र शमीम पठाण यांचे देखील असून पठाण कुटुंब अत्यंत संस्कारी व धार्मिक कुटुंब नुकताच १० वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला शमीम खान पठाण यांचा मुलगा देखील राशद खान शमीम खान पठाण हा देखील इयत्ता १० वीत असल्याने त्याच्या १० वीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते परिस्थितीवर मात करीत राशद खान पठाण याने देखील ७२.२० टक्के मार्क घेऊन १० वी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले एका सर्वसामान्य धार्मिक अल्पसंख्याक कुटुंबात जन्मलेल्या राशद खान याचे १० वी बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद म्हणावे लागेल त्याच्या या यशाबद्दल त्याच्यासह पठाण कुटुंबाचे देखील शतशः हार्दिक अभिनंदन..... 

चौधरी दिनेश (रणजित) 

संपादक/संचालक जंग-ए-अजित न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या