🌟परभणीत 'संबोधी अकादमी'च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात 62 जोडपे झाले विवाहबद्ध.....!


🌟या विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून खा.फौजिया खान यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


परभणी (दि.26 मे 2024) - संबोधी अकादमी महाराष्ट्र  यांच्या वतीने आयोजित 23 वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी 26 मे. रोजी महात्मा फुले हायस्कुल, जिंतूर रोड येथे  संपन्न झाला. या अतिशय शिस्तबद्ध व नेत्रदिपक विवाह सोहळ्यात 62 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. मंगल परिणय विधी भन्ते पय्याबोधी,नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संबोधी अकादमीने महाराष्ट्रामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ राबवली.तसेच ते म्हणाले की,अन्यायाला नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे.यावेळी भन्ते मोगलायन,पोखर्णी (नृसिंह) व भिखू संघ उपस्थित होते. हिंदू धर्म पद्धतीने विवाह विधी अरुणगुरु माटेगावकर,आदित्य दडके यांनी संपन्न केला. 

प्रमुख अतिथी म्हणून खा. फौजिया खान म्हणाल्या की, वंचित घटकाना समृद्ध करण्याचे काम झाले पाहिजे आणि या घटकास समृद्ध करण्याचे काम संबोधी अकादमी करत आहे.तसेच त्या म्हणाल्या की,संविधान बळकटीचे कार्य संपूर्ण समाजाने एकत्र येऊन करावे. सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळाले पाहिजे अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. प्रमुख अतिथी खा. संजय जाधव यांच्या हस्ते वधू -वर यांना विवाह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. राहुल पाटील हेही उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ. सिद्धार्थ भालेराव म्हणाले की, समाजातील अत्यंत गरीब घटकास मदत व्हावी म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वभर गावंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दत्ता शिंदे, मिलिंद सावंत,गौतम मुंढे, भीमप्रकाश गायकवाड हेही उपस्थित  होते. प्रास्ताविक करताना समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे  आयोजक तथा अध्यक्ष, संबोधी अकादमी, महाराष्ट्र हे म्हणाले की, अनावश्यक खर्च टाळावा,चुकीच्या रूढी परंपरा याला आळा बसावा म्हणून या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून संबोधी अकादमी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.  विवाहच्या दिवशी अनुदान देणे अपेक्षित असताना अद्याप गतवर्षिचे अनुदान सामाजिक न्याय विभागाने दिले नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजपर्यंत 2200 जोडप्यांचे विवाह लावल्याबद्दल नालंदा विपश्यना केंद्र, परभणी यांच्या वतीने भीमप्रकाश गायकवाड, करण गायकवाड आदींनी समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांचा सह्रदय सत्कार केला.या विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेंतर्गत रु.20000 चा धनादेश देण्यात येणार असून संबोधी अकादमी तर्फे वधु वरांना विवाह प्रसंगीचे शुभ्र वस्त्रे मोफत पुरविण्यात आली  आहेत तसेच सुरुची भोजन व  भव्य दिव्य शामियानाची व्यवस्था करण्यात आली.सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप, गौतम साळवे, विवाह सोहळा समिती प्रमुख , डॉ. अरविंद सावते, शेषराव जल्हारे, भीमराव पतंगे, गौतम मुंढे, सचिनराजे हत्तीअंबीरे, बाळासाहेब अंभीरे, सिद्धार्थ भराडे, डी. आर.  तूपसमिंदर, बी.आर आव्हाड, दि.फ.लोंढे, उत्तम साळवे, अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, भगवान मानकर, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, विश्वनाथ डबडे, बंडू नरवाडे, एकनाथ खंदारे, एल.आर.कांबळे, संभाजी खिल्लारे,रोहिदास साखरे, बी. आर. आव्हाड, संतोष भराडे, मुरलीधर ढेंबरे डॉ. राजेश्वर पालमकर,डॉ. लक्ष्मन कांबळे,  नवनाथ पैठणे, माधव मोते, गौतम कठाळे, राजेश चांदणे, भीमराव धबले,राजेश पंडित, संभाजी खिल्लारे, गंगाधर परसोड, धनंजय रणवीर, सोनाजी लांडगे, बाबासाहेब भूजावळे, दीपक जाधव, हेमंत घुगे, साहेबराव ढगे, अरुण पंचांगे, डॉ. नामदेव मुळे, प्रभाकर कांबळे, भीमराव श्रीखंडे, अनिरुद्ध धरपडे,सुर्यकांत उजगरे, सुरेश मगरे  आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या