🌟परभणीत निःशुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर 6 मे 2024 पासून....!


🌟जास्तीत जास्त खेळाडू तसेच शाळांनी या शिबिराचा लाभ घ्यावा - जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे 

परभणी (दि.03 मे 2024) :  जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत खो-खो व मैदानी (अँथलेटीक्स) या खेळांचे प्रशिक्षण शिबीर श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी बॉस्केटबॉल व रग्बी खेळाचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. 6 ते 15 मे दरम्यान निशुल्क राहणार आहे.

हे शिबीर सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात खो-खोसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे (9422178009), अनिल नलावडे (9764106985), रणजीत जाधव (9890821823) व मैदानी खेळासाठी शेख कादर (9096967806) आणि कैलास टेहरे (9860914540) हे मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच बास्केटबॉल खेळासाठी प्रशिक्षक बालाजी वाघ (8806500702), प्रकाश पंडित (8788525374) व रग्बी खेळासाठी प्रशिक्षक शिवाजी खुणे (9970855847) आणि  योगेश आदमे (9307162191) हे मार्गर्शन करणार आहेत.हे शिबीर निशुल्क असून, जास्तीत जास्त खेळाडू तसेच शाळांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या