🌟परभणी लोकसभेची मतमोजणी परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू....!


🌟कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात विधानसभानिहाय होणार मतमोजणी🌟 

परभणी (दि.29 मे 2024) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल, 2024 रोजी मतदान झाले. मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी  येथे  विधानसभानिहाय सकाळी 8 वाजेपासून होणार आहे. 

त्यानुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद केले आहे.

मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे. 

सदरील आदेश निवडणुकीची कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या