🌟बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत 31 मे ला सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा व बहुजन रत्न पुरस्कार सोहळा....!


🌟तसेच हभप.धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांच्या प्रबोधन कार्यक्रमाचे देखील आयोजन🌟 

✍️ मोहन चौकेकर 

चिखली -: ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेर घर (महिला आश्रम) भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा र. नं. Mh534 F11058/09 यांच्या वतीने विश्वरत्न विश्व शांती दूत तथागत भगवान बुद्ध जयंती व अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त लोकप्रतिनिधी,राजकीय नेते सामाजिक नेते जेष्ठ पत्रकार समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा तसेच फुले शाहू आंबेडकरी विचार धारेला तेवत ठेवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करून जनसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्या च्या प्रत्येक जिल्ह्यातील एका व्यक्ती ला बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ह. भ. प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचा फुले शाहू आंबेडकरी विचारावर कीर्तन दि. 31 मे 2024 ला रोज शुक्रवार ला पंचशील बुद्ध , गजानन नगर चिखली ता. चिखली जिल्हा बुलडाणा येथे होणार आहे. राज्य शासनाच्या कन्यादान योजने अंतर्गत सोहळ्यात सहभागी होऊन विवाह बद्ध होणाऱ्या जोडप्यांना अनुदान 20,000/- (अक्षरी - वीस हजार रुपये) आर्थिक मदत वधू पित्यास मिळणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्र संस्था कार्यालयत जमा करावे.

१) अर्जदार यांचा विहीत नमूण्यात अर्ज 

२) बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबत वर/वधू यांनी लिहुन द्यावयाचे विहीत नमूण्यात प्रतिज्ञापत्र.३) जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत.

४) महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचा पुरावा.५) लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधीत शेतकऱ्याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला ६) लाभार्थ्याचे पालक हे शेतमजूर असल्याबाबत संबंधीत गावातील तलाठी / ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र व त्या गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला 7) वधु वराचे आधार कार्ड 8) पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स 9) अविवाहीत प्रमाणपत्र (वधु व वर) 10) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वधुच्या वडीलांचे / आईचे)

11) विवाह नोंदणी प्रमाणपत्र

12) आधार कार्ड वधुच्या आई वडिलांचे  कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 8855850378, यानंबरवर संपर्क करावा असे आवाहन ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे......

✍️ मोहन चौकेकरटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या