🌟जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेलसवाडी गावात खैवाडीला आग....!


🌟ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फायर ब्रिगेड मदतीला धावली आगीत ०५ गुरांचा आगीने होरपळून मृत्यू ०२ गुरांना वाचवण्यात यश🌟


जळगाव/भुसावळ :- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेलसवाडी गावात आज सोमवार दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ०४.२० वाजेच्या सुमारास खैवाडीला भयंकर आग लागल्या संदर्भात मुक्ताईनगर पोलिस स्थानकातून ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फायर ब्रिगेडला फोन आला.


 त्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेऊन एम.एच.१९ सीवाय ४९९७ फायर टर्न आउट बरोबर नाईट शिफ्ट इंचार्ज एस.जी.जयस्वाल,एफईडी सी.के.गवळी,एन.एस.पाटील,एम.व्ही.सोनार,श्याम वराडे,एम.आर.कुरेशी,पाटील दरवान यांचे पथक तात्काळ घटनास्थळी आग विझविण्यासाठी धावले होते फायर ब्रिगेडच्या पथकाला गाव हे माहीत नसल्यामुळे व पथक प्रमुखांचा मोबाईल घरी असल्याने त्यांनी आग विझवण्यासाठी जातांना गावाचे लोकेशन घेण्यासाठी घरी फोन करून मोबाईल मागवून घेतला त्यांच्या मुलाने मेन रोडवर मोबाईल आणून दिला त्यामुळे गुगल मॅप च्या साह्याने अल्पशा वेळेत बेलसवाडी गावापर्यंत पोहचता आले पण आग भयंकर असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बराच वेळ लागला या भयंकर आगीच्या घटनेत चार ते पाच गुरे,तीन ट्रॅक्टर व मोठ्या प्रमाणात गुरांचा चारा,ठिबकच्या नळ्या,लाकडं पेटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या भयंकर आगीच्या घटनेत पाच गुरांचा आगीने होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन गुरांना वाचवण्यात ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फायर ब्रिगेडच्या पथकाला यश आलं असून ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फायर ब्रिगेडच्या पथकाने दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या