🌟नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेस मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या 16 विद्यार्थ्यांची निवड......!


🌟विजयी सर्व विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले🌟


                                                                                        परभणी जिल्हा वरिष्ठ अथलेटिक्स अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा मानवत येथील के.के.महाविद्यालयात घेण्यात आल्या असून या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड हीं 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अथलेटिक्स चॅम्पिनशिप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा संकुल नागपूर येथे 1जून तें 3 जून रोजी होणाऱ्या स्पर्धेस निवड झाली आहे. 



मानवत येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विजयी विद्यार्थ्यात 1) धारेश्वर सोळंके 100 मी. धावणे प्रथम 2)वैष्णवी वारखड 100 मी धावणे प्रथम भाला फेक तृतीय 3) गायत्री कदम 100 मी तृतीय ,200 मी तृतीय उंच उडी प्रथम 4) मुगाजी सोळंके 400 मी. द्वितीय 5) संतोष रोडगे 400 मी 800 मी धावणे तृतीय 6) सलोनी बायस 200 मी द्वितीय 7) अंकिता कदम 1500 मी धावणे प्रथम 8) कोमटवार पद्मजा 800 मी. लॉन्ग जंप प्रथम  9) विशाल कोमटवार 400 मी हर्डल्स प्रथम 10) गंगाधर 1500 मी तृतीय, 400 मी हर्डल्स द्वितीय, 11) अर्जुन कदम 5000 मी धावणे तृतीय 12) अभय गोरे थाळी फेक प्रथम 13) चंद्रकांत भाग्यवंत थाळी फेक द्वितीय, भाला फेक तृतीय 14) अविनाश पानोडे लांब उडी प्रथम 15) पियुष वांगे लॉन्ग जंप द्वितीय 16) विष्णू बोकारे उंच उडी प्रथम  आले असून या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ.गणेश काचगुंडे सर बालरोग तज्ञ. वैद्यकीय अधिकारी पूर्णा यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या प्रसंगी उपस्तित डॉ. संतोष गवळी सर, जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री.सज्जन जैस्वाल, जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री.वसंत कऱ्हाळे श्री. अतुल शहाणे, स्वराज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पूर्णा चे संचालक ज्ञानेश्वर बोकारे आदी उपस्तिथ होते. वरील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून या प्रसंगी इंदिरा गांधी विद्यालयाचे जेष्ठ क्रीडा शिक्षक 29 वर्षे सेवा देऊन नुकतेच रिटायर झाले असून खेळाडू व क्रीडा शिक्षक तसेच मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी पूर्णा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. वरील  विजयी सर्व विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या