🌟हिंगोली जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने 15 दिवसीय उन्हाळी क्रिड़ा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन....!.


🌟वसमत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थानी लाभ घ्यावा असे अवाहान क्रिडाधिकारी श्री मारावार यांनी केले आहे🌟 

वसमत : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीङा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने  हिंगोली जिल्हा सोर्टस् कराटे डो असोशिएशन , हिंगोली  जिल्हा कुडो असोशिएशन , व हिंगोंली जिल्हा सिकई मार्शल आर्ट यांच्या सहकार्याने क्रीडा संकुल वसमत येथे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश्वर मारावार  क्रीडाधिकारी श्री आत्माराम बोथीकर यांच्या मार्गदर्शना खाली पंधरा दिवसीय उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे सदरील प्रशिक्षण शिबीर दि. 6 मे 2024 ते 20 मे 2024 या कालावधीत सकाळी 6 ते 8 या वेळेत 6 वर्षा पूढील वय असलेल्या शालेय मुला ,मुलींचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल  वसमत हु.बहिर्जी इंटरनैशनल स्कूलच्या बाजुला संपन्न होणार असुन सहभागी खेळाडुंना प्रमाणपत्र वितरीत होणार आहेत.

  महाराष्ट्र शासनाच्या यादीतील ग्रेस गुण व 5% आरक्षण पात्र खेळा ची खेळाडूना ओळख होऊन खेळाची गोडी लागावी व भविष्यात त्यांना शासन सेवेत दाखल होण्यासाठी व शैक्षणीक लाभ व्हावा तसेच या आधुनिक युगात विद्यार्थी व विदयार्थीनी चे मैदाणी खेळ खेळण्याचे प्रमाण दिवसे दिवस कमी होत चालले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्या वर परिणाम होत आहे. देशाचे भावी आधारस्तंभ तंदुरुस्त ,बलवान बनले पाहीजे त्यांचा बौध्दीक विकासा सह शारीरीक निकास झाला पाहिजे मुलींच्या बाबतीत त्यांच्यात आत्मविश्वास वृदिगंत होऊण स्वंसरंक्षण करण्याची क्षमता यायला पाहीजे या करिता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. वसमत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थानी लाभ घ्यावा असे अवाहान क्रीडाधिकारी श्री मारावार व श्री बोथीकर यांच्या सह क्रीड़ा असोशिएशन चे जिल्हाध्यक्ष गोपाल इसावे ,विजय डोंगरे यांनी केले आहे. 

नाव नोंदनी करिता प्रशिक्षक संतोष नांगरे , शेख मोईन , हर्षद खरे ,प्रविण कांबळे ,  अनिल टाकणखार ,कु.तेजल रामपुरकर, संबोधी गायकवाड यांच्याशी संपर्क करावा मो.9850043982

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या