🌟रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील संत गाडगे महाराज विद्यालयाची 12 वी पाठोपाठ 10 वी निकालातही बाजी...!


🌟विद्यालया मधून प्रथम येण्याचा मान कु.स्नेहल मुलगीर 93.80% गुण घेऊन मिळवला🌟

फुलचंद भगत

वाशिम:-रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी झाला असून या परीक्षेत सुद्धा इयत्ता 12 वी प्रमाणे 100% प्रवीष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयातुन एकूण 48 विद्यार्थी परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते त्यापैकी 47 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि सर्वच एकूण 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी 34 विद्यार्थी हे प्रविण्य श्रेणित उत्तीर्ण झाले तर 11 विद्यार्थी हे प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाले व 2 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणित उत्तीर्ण झाले.

  विद्यालया मधून प्रथम येण्याचा मान कु.स्नेहल मुलगीर 93.80% गुण घेऊन मिळवला तर द्वितीय क्रमांक वैभव त्र्यंबक रवणे 91.60% तसेच तृतीय क्रमांक सुदाम लक्ष्मण घुगे 87.60% याने मिळवला विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधित ठेवत परिसरात एक उत्तम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असण्याचा मान मिळवला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष दत्तरावजी धांडे, मुख्याध्यापक नागेश धांडे व सर्व शिक्षक शिक्षिका तसेच सर्व स्टाफ ला दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या