🌟नांदेड येथे पायाभूत शिक्षण आचार्य प्रशिक्षण वर्गाचा उद्या शुक्रवार दि.11 मे रोजी समारोप......!


🌟समारोप सोहळा दि. 11 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इंटरनॅशनल स्कूल येथे होणार🌟

नांदेड (दि.10 मे 2024) - विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थांच्या वतीने नांदेड शहरात आयोजित 12 दिवसीय पायाभूत शिक्षण आचार्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सहयोग एज्युकेशनल कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला आहे. 

विद्याभारती च्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रात प्रांतनिहाय आचार्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. दिनांक 2 मे ते 12 मे दरम्यान हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. समारोप सोहळा दि. 11 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इंटरनॅशनल स्कूल येथे होणार आहे. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे हे राहणार आहेत. सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोप सोहळ्यास विद्याभारतीचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. विवेक काटदरे, प्रांतमंत्री प्रकाश पोतदार, वर्ग संयोजक वनमाला कुलकर्णी यांच्यासह नांदेड विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवदत्त भानुदासराव देशपांडे व कल्पना कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या