🌟संत गाडगे महाराज विद्यालयाचा 100% टक्के निकाल यशाची परंपरा कायम.....!


🌟विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय हे संस्थाध्यक्ष तसेच प्राचार्य नागेश धांडे व तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांना दिले🌟

फुलचंद भगत

वाशिम:-रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील संत गाडगे महाराज माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचा फेब्रु/मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल हा 21 मे रोजी जाहीर झाला असून महाविद्यालयाचा निकाल हा 100% टक्के लागला असून महाविद्यालयातून  147 विद्यार्थी परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच 147 विद्यार्थी हे अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

    महाविद्यालय मधून तसेच परिसरातून कु. श्रुती विद्याकुमार मोरे हिने 94.90% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक हा गजानन शिंदे व तृतीय क्रमांक हा कु. गायत्री मारोतराव देशमुख या विद्यार्थिनीने पटकावला आहे.  147 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी हे 90 % च्या वर टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झाले व 79 विद्यार्थी हे 80 % च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले तसेच 10 विद्यार्थी हे 75% च्या वर टक्केवारी घेऊन 

 उत्तीर्ण झाले व 4 विद्यार्थी हे प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दत्तरावजी धांडे यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय हे संस्थाध्यक्ष तसेच प्राचार्य नागेश धांडे व तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांना दिले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या