🌟परभणी येथील 'मराठवाडा हायस्कूल'चा 100 टक्के निकाल : 133 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण....!


🌟मराठवाडा हायस्कूलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली🌟


परभणी (दि.27 मे 2024) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवार 27 मे रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये येथील एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल या शाळेच्या सेमी इंग्रजी विभागाचा 100 टक्के निकाल लागला असून,मराठवाडा हायस्कूलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

         मराठवाडा शाळेच्या शिवाजी नगर शाखेच्या सेमी इंग्रजी विभागाचा विद्यार्थीनी कुमारी चैत्राली जलबा उगले 99.20 टक्के गुण घेऊन गुणानूक्रमाणे प्रशालेतून सर्व प्रथम आला. चिरंजीव चव्हाण साईनाथ सुधाकर व कुलकर्णी वेदिका विजयराव या विद्यार्थ्यांनी 98 टक्के गुण घेवून द्वितीय, कुमारी अर्पिता दिनेश चोथवे ही विद्यार्थिनी 97.80टक्के गुण घेवून तृतीय आली असून 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारी विद्यार्थी संख्या ही 15 आहे.. शाळेत 45 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर 133 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन गुणवंत ठरले आहेत..मागील 17 वर्षांपासून सेमी इंग्रजी विभागाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

          विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, दिलीपराव कुलकर्णी, सचिव संतोष धारासुरकर, कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे, ज्येष्ठ संचालक नाथराव देशमुख,नंदकुमार देशमुख, सौ पुष्पा मंगरूळकर, सौ चंद्रलेखा मालेगावकर, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक शिवाजीराव आरळकर, सुर्यकांत पाटील, एन. एल. साळवे, सुनील रामपुरकर, संजय नागरे, सौ दिपाली जोशी,श्री राजेश उफाडे ,श्रीपाद कुलकर्णी, विश्‍वास दिवाळकर, गोपाळ रोडे,गणेश सुर्यवंशी, डॉ. सुनील तुरुकमाने, अमोल गोरकट्टे, अभिजित कुलकर्णी, विनोद लोलगे, शिवराम कटारे, अविनाश कंधारकर, सागर सुडके यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या