🌟वाशिम जिल्ह्यातील 1 हजार 398 जलस्त्रोतांची होणार तपासणी ; पाणी व स्वच्छता विभागाची मोहीम....!


🌟यासाठी 1 मे पासून मोहीम सुरु झाली आहे ३० जुन पर्यंत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार🌟

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील 1 हजार 398 जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 1 मे पासून मोहीम सुरु झाली आहे. ३० जुन पर्यंत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे.याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा सल्लागार तसेच बीआरसी व सीआरसी यांची बैठक घेऊन निर्देश दिले. यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून दरवर्षी पावसाळ्याच्या आधी व पावसाळ्यानंतर अशी दोनवेळा जलस्त्रोतांची तपासणी केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 398 जलस्त्रोतांची तपासणी पाणी व स्वच्छता विभागामार्फत सुरू करण्यात आलीआहे.

*नळाद्वारा पाणी पुरवठ्याची होणार तपासणी :-

बहुतांश गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील 1 हजार 398 नळ पाणीपुरवठा योजनाचे स्त्रोत वा मोहिमेतर्गत तपासण्यात येणार आहेत. तसेच ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध एटीके च्या माध्यमातुन 1 हजार 149 शाळा व 894 अंगणवाडी केंद्रातील पाणी तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे हा या मोहिमेचा उद्देश आहे.ग्रामीण भागात अनेक आजार है अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे होत असतात जलस्त्रोतांची तपासणी ३० जुनपर्यंत करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे १ मे पासून तालुकानिहाय तपासणी सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता मिशन कक्षामार्फत दरवर्षी जलस्त्रोतांच्या पाण्याची रासायनिक तपासणी करण्यात येते. पाणी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतींमार्फत गोळा करण्यात येतात, त्या अनुषंगाने सर्वच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे म्हणजेच विहिरी, कूपनलिका आणि हातपंपाचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक व आरोग्य सहायकांच्या सहकार्याने गोळा करण्यात येणार आहेत. या पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. तसेच जलस्त्रोतांचा परिसर, पाणीपुरवठा योजनांची पाणी शुद्धीकरण प्रक्रिया याची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवता निश्चित करणार आहेत.

"पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी व  जलजन्य आजारापासून बचाव  करण्यासाठी  ग्रामपंचायत स्तरावरून सर्व प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याकरिता ग्रामपंचायतींनी 10 जून पर्यंत पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करावी."

-किरण गणेश कोवे,

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या