🌟पुर्णेत उद्या दि‌.१२ एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीचे आयोजन....!


🌟शहरातील नगर परिषद सभागृहात सकाळी १०-०० वाजता शांतता कमिटीचीच्या बैठकीचे आयोजन🌟 

पुर्णा (दि.११ एप्रिल) - पुर्णा शहरातील नगर परिषद सभागृहात उद्या शुक्रवार दि.१२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास परभणी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच रामनवमी,हनुमान जयंती, महावीर जयंती व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शांतता कमिटीच्या बैठकीत शहरासह तालुक्यातील सर्व पोलिस पाटील शांतता समितीचे सदस्य,ज्येष्ठ नागरिक,प्रतिष्ठीत व्यापारी पत्रकार यांनी आवर्जून हजर राहावे असे आवाहन पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांनी केले असून या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, तहसिलदार माधवराव बोथीकर,पो नि.विलास गोबाडे हे मार्गदर्शन करणार आहेत......


                

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या