🌟पोहरादेवी याञेनिमित्य येणार्‍या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानकाला भेटी देवुन केल्या महत्वाच्या सुचना....!


🌟यात्रेकरुंच्या व्यवस्थे करिता बसस्थानकाचे व्यवस्थापक श्री रविंद्र क्षिरसागर हे खूप मेहनत घेत आहे🌟


फुलचंद भगत

वाशिम :- दिनांक 16/04/2024 रोजी पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेच्या निमित्ताने मानोरा येथिल बसस्थानक येथे भेट देण्यात आली आहे.पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता बसस्थानकाची संपूर्ण स्वच्छ्ता करण्यात आली आहे.येथिल बाथरूम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


याकरिता बसस्थानकाचे व्यवस्थापक श्री रविंद्र क्षिरसागर हे खूप मेहनत घेत आहे.यावर विभागीय नियंत्रक श्रीमती शुभांगी शिरसाट नियंत्रण ठेवून आहेत. त्यांनी पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांकरिता कारंजा व मंगरूळपीर येथून मानोरा येथे येण्या जाण्याकरिता जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. कारंजा येथील आगार व्यवस्थापक श्री मोरे साहेब तसेच मंगरूपिर आगारामधून सुद्धा पोहरादेवी यात्रे करिता जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या