🌟नांदेड-पनवेल-नांदेड मार्गे औरंगाबाद-कल्याणला जाणारी विशेष गाडी रद्द.....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे🌟

नांदेड (दि.३० एप्रिल) : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रवाशी संख्ये अभावी नांदेड-पनवेल-नांदेड मार्गे औरंगाबाद-कल्याणला जाणारी विशेष प्रवासी रेल्वे गाडी रद्द केली आहे.

             उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने गाडी क्रमांक ०७६२५/०७६२६ ही हुजूर साहीब नांदेड-पनवेल-हुजूर साहिब नांदेड मार्गे औरंगाबाद-कल्याणला जाणाऱ्या विशेष प्रवासी रेल्वे गाडीच्या ४० फेर्‍या मंजूर केल्या होत्या परंतु या गाडीस प्रवाशांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळाल्यामुळे ही गाडी तात्काळ प्रभावाने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या