🌟पुर्णेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी लाखोचा निळा जनसागर लोटला....!


🌟जय भिमच्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमूली अवघी पुर्णा नगरी : विविध महापुरुषांना अभिवादन करत भिम जयंती उत्साहात साजरी🌟


पुर्णा (दि.१५ एप्रिल) - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती काल रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सार्वजनिक भिम व बुध्द जयंती मंडळाच्या वतीने डॉ.आंबेडकर चौक येथे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो,भदंत पय्यावंश,भंते बोधिधम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ रिपाइं नेते तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाशदादा कांबळे,परभणी जिल्हा समाजभूषण माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील यांच्या हस्तें पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येवून महामानव विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

पुर्णा शहरातील डॉ आंबेडकर नगर परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक भिम व बुध्द जयंती मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात भिम जयंती मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मिरवणुकीतील मुलींच्या पारंपारिक वेशभूषेतील लेझीम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते यावेळी जय भिमच्या गगनभेदी घोषणांनी अवघीं पुर्णा नगरी दुमदुमली होती या मिरवणुकीत उत्साही तरुण भिमगितांवर नाचतांना पाहून प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होत होता.

पुर्णा शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथून दुपारी मिरवणुकीला सुरुवात झाली डॉ.आंबेडकर नगर,सिध्दार्थ नगर,रेल्वे कॉलनी,पंचशील नगर,कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर (मराठगल्ली),शहिद भगतसिंग चौक,सोनार गल्ली,छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी पुतळा परिसर,महात्मा बसवेश्वर चौक आदी परिसरातील महापुरुषांना अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने अभिवादन करुन भव्य ऐतिहासिक भिम जयंती मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणुकी दरम्यान शहरातील विविध भागात मिरवणुकीत सहभागी माता-भगिनी अबालवृद्ध तसेच अनुयायांठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने थंड पाणी शरबतची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो,भदंत पय्यावंश,भंते बोधिधम्मा,जेष्ठ रिपाइं नेते तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाशदादा कांबळे,परभणी जिल्हा समाजभूषण माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,नायब तहसीलदार प्रशांत थारकर,बोधाचार्य त्र्यंबक कांबळे,श्रीकांत हिवाळे सर,मा.नगरसेवक तथा बिएसपी नेते देवराव खंदारे,साहेबराव सोनवणे,ॲड.महेंद्र गायकवाड,किशोर ठाकरगे,चक्रवर्ती वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित,राहूल खंडागळे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,अतूल गवळी,ॲड.मधुकर गायकवाड आदी मान्यवरांसह विविध सामाजिक संघटना/राजकीय पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मंडळांच्या सन्माननीय पदाधिकारी माता-भगिनी अबालवृद्ध तसेच लाखों अनुयायी या भव्य ऐतिहासिक भिम जयंती मिरवणुक सोहळ्यात सहभागी झाले होते मिरवणूक अत्यंत शांततेत व शिस्तबध्द पध्दतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलासजी गोबाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या