🌟जालना-छपरा- जालना साप्ताहिक विशेष गाडीला देण्यात आली मुदतवाढ...!


🌟या दोन्ही विशेष गाड्या पूर्वीच्या वेळापत्रका नुसार धावतील असे कळविण्यात आले आहे🌟

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनने उन्हाळ्यात होणारी प्रवास्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन बिहार राज्यातील छपरा ते महाराष्ट्र राज्यातील जालना ही साप्ताहिक विशेष क्रमांक ०७६५१/०७६५२ या जालना-छपरा- जालना विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.

             गाडी  क्रमांक ०७६५१/०७६५२ जालना-छपरा-जालना साप्ताहिक विशेष गाडी जालना येथून आज बुधवार दि.०३ एप्रिल ते २६ जून २०२४ दरम्यान दर बुधवारी रात्री ११-३५ वाजता सुटेल आणि मनमाड, इटारसी, प्रयागराज, वाराणसी, गाझिपूर सिटी मार्गे छपरा येथे तिसर्या दिवशी सकाळी ०५-३० वाजता पोहोचेल. तर  परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६५२ छपरा ते जालना ही विशेष गाडी छपरा येथून शुक्रवार दि.०५ एप्रिल ते २८ जून २०२४ दरम्यान दर शुक्रवारी रात्री ११-१५ वाजता सुटेल आणि गाझिपूर सिटी, वाराणसी, प्रयागराज, इटारसी, मनमाड मार्गे जालना येथे तिसर्या दिवशी पहाटे 4 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांत वातानुकूलित, द्वितीय शय्या आणि साधारण श्रेणी चे 18 डब्बे असतील.  या दोन्ही विशेष गाड्या पूर्वीच्या वेळापत्रका नुसार धावतील असे कळविण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या