🌟महाराष्ट्रात महायुतीस पोषक असे वातावरण : सर्वसामान्य मतदार भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी.....!


🌟गेल्या निवडणूकीपेक्षा जास्त जागा या लोकसभा निवडणुकीत जिंकू मुख्यमंत्री शिंदे यांनी पाथरीत व्यक्त केला विश्‍वास🌟 


परभणी (दि.२३ एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आज मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ रोजी आयोजित सभेसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या लोकसभा निवडणूकीत मागील निवडणूकीपेक्षा जास्त जागा महायुतीस निश्‍चितच मिळतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

               परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे हे आज मंगळवारी दुपारच्या सुमारास हेलिकॉप्टरद्वारे पाथरीत दाखल झाले होेते त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीस पोषक असे वातावरण आहे, सर्वसामान्य मतदार भक्कमपणे पाठीशी आहे. त्यामुळेच गेल्या निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत निश्‍चितच जादा जागा मिळतील, असा विश्‍वास व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले होते, असा आरोप करीत शिंदे यांनी हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह अबाधित राखण्याचे काम आपण एक निष्ठावान सैनिक म्हणून इनामे इतबारे केले आहे, अशी ग्वाही दिली.

             महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. या आघाडीत कुठेही एकवाक्यता नाही, असेही स्पष्ट करतेवेळी महाराष्ट्रातील सर्व प्रतिष्ठेच्या जागा महायुतीच्या पदरात पडतील, असाही विश्‍वास व्यक्त केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या